Tanuja and associates
A 703 Divya Smit, Next to Blue Empire Complex,
Bandar Pakhadi Road, Kandivli (W), Mumbai, Maharashtra 400 067
India
Smart Dining Area | Tanuja And Associates Blogs

Blogs

Smart Dining Area

स्मार्ट डायनिंग एरीया

In Residential Interior / by Tanuja Rane

तुमची डायनिंग रुम किंवा डायनिंग एरीया हा तुमच्या घराच्या इंटिरियरचा एक महत्वाचा हिस्सा अाहे. तुमच्या सर्व कुटुंबीयांचे जिथे एकत्र जेवण, नास्ता करते, पाहुण्यांचे स्वागत जेथे केले जाते अशा जागेचे महत्व विसरून कसे चालेल?
डायनिंग एरीयामधील सर्वात महत्वाचा भाग म्हणजे डायनिंग टेबल, त्यामुळे ते निवडताना त्याची साइज म्हणजेच लांबी रुंदी काय असावी हे ठरवावे लागते यासाठी कुटुंबातील व्यक्तींची संख्या त्यांच्या जेवणाच्या सवयी ह्यांचा विचार करावा लागतो. त्याचबरोबर आपण ठरवलेल्या साईजचे डायनिंग टेबल हे डायनिंग एरीया मधे ठेवल्यावर आजुबाजूला वावरायला पुरेशी जागा आहे का ? हे देखील पाहिले पाहिजे. त्यानंतर डायनिंग टेबल कोणत्या मटेरियल पासून बनवावे हे ठरवावे लागते. ह्यात पूर्ण लाकडापासून बनवलेले डायनिंग टेबल, विविध प्रकारच्या मार्बल पासून किंवा मार्बल अथवा ग्लास टाॅप आणि त्याला मार्बल किंवा वुडन बेस असलेले डायनिंग टेबल असे विविध पर्याय आपल्या घराच्या डेकोर प्रमाणे निवडतां येतात.
डायनिंग टेबलाच्या शेजारी क्रॅाकरी युनिट असल्यास उत्तम. त्यात विशेष वापरातील क्राॅकरी ठेवतां येते शिवाय त्याच्या टाॅपचा साईड बोर्ड म्हणून वापर करता येतो ज्यावर डायनिंग टेबलावर वाढायचे जेवण आणून ठेवतां येते.
 
डायनिंग टेबलच्या मागची किंवा बाजुची भिंत याला खुपच महत्त्व आहे त्या भिंतीला गडद रंग, वाॅलपेपर किंवा एखादे वाॅल आर्ट वापरून डायनिंग एरिया उठावदार करता येतो.
केवळ जेवणच फक्त तुमच्या डायनिंगचे महत्व वाढवते असे नाही तर एखादा सुंदर रनर व टेबल मॅटस् वापरून टेबलावर मध्यभागी डेकोरेटिव्ह पाॅट किंवा सेंटर पीस वापरून व तुमच्याकडील एक्सक्लुझीव्ह क्राॅकरी डायनिंग टेबलावर ठेवून अशाप्रकारे अॅम्बीयन्स तयार करून तुम्ही तुमच्या पाहुण्यांना एक लज्जतदार जेवणाचा एक शाही अनुभव देऊ शकता.
 
डायनिंग एरीयाची प्रकाश योजना देखील फारच महत्वाची आहे. डायनिंग टेबलावर लावलेला डेकोरेटिव्ह लाईट डिमरवर असेल तर तुमचा मुड सेट करण्यासाठी तो मदत करतो. त्यापुढे जाऊन एखादा कॅंडल स्टॅन्ड वापरुन कॅंडल लाईट डिनर तुम्ही करू शकता.  
 
तुमच्या कडे येणाऱ्या पाहुण्यांचे आदरातिथ्य  म्हणजे घरी पार्टी असल्यास डायनिंग एरीया डेकोरेटिव्ह असणे फार महत्त्वाचे असते. चांगली प्रकाश योजना, चोखंदळपणे घेतलेले डायनिंग टेबल व त्यांवर केलेले डेकोरेशन तुमच्या पूर्ण घराचा सेंटर आॅफ अॅट्रॅक्शन बनू शकतो आणि अशा डेकाॅरमध्ये तुमच्या स्वादिष्ट जेवणाचा आस्वाद घ्यायला तुमचे पाहुणे नेहमीच उत्सुक असतील.
 

तनुजा योगेश राणे

इंटिरियर डिझाइनर