Tanuja and associates
A 703 Divya Smit, Next to Blue Empire Complex,
Bandar Pakhadi Road, Kandivli (W), Mumbai, Maharashtra 400 067
India
Guest Room | Tanuja And Associates Blogs

Blogs

Guest Room

पाहुण्यांची बेडरुम

In Interior / by Tanuja Rane

खरतर गेस्ट बॆडरुम असणं ही शहरातील लोकांसाठी लक्झरी असण्यासारखे अाहे. अाणि जर ती आपल्याकडे असेल तर त्या जागेचा योग्य तो वापर करुन तुमच्या पाहुण्यांसाठी ती जागा सुखदायी कशी करता येईल याचा नक्कीच विचार केला पाहिजे.

गेस्ट बेडरूमचे इंटिरीअर करताना कोणालाही पाहताक्षणी आवडणारे असले पाहिजे. कोणालाही सहजपणे वापरता येईल अशी त्याची मांडणी असली पाहिजे. तुमच्या पर्सनलाईज्ड बेडरूमच्या तोडीचे पण कोझी इंटिरिअर असेल तर ती रूम कोणालाही वापरायला नक्कीच आवडेल.

ह्या रुमचे इंटेरीयर करताना थोडे उठावदार रंग व पॅटर्नचा प्रयोग तुम्ही बेडशीट्स , पडदे, 

बेडमागील वाॅलपेपर यामध्ये करु शकता ज्यामुळे तुमच्या रूमला एक छान समर टोन लुक मिळेल. भिंतींचा रंग शक्यतोवर पांढरा किंवा हलक्या रंगाचा ठेवावा त्यामुळे बाकी बेडकव्हर, पडदे, उशा, वाॅलपेपर यामध्ये उठावदार रंगांचा वापर करू शकतो.

गेस्टरूमध्ये वापरण्यासाठी डबल बेड, सिंगल बेड, सोफा कम बेड, वाॅल बेड असे विविध पर्याय बेडसाठी उपलब्ध आहेत. गरजेनुसार व जागेच्या आकारमानानुसार कुठल्या प्रकारचा बेड वापरायचा हे ठरवावे लागते. बेडची साइड टेबल्स व बेड सोडुन मोकळी जागा जास्तीत जास्त असल्यास पाहुण्यांचे सामान ठेऊनही वावरण्यासाठी सोपे होते. ह्या साठी वाॅलबेडचा पर्याय उत्तम आहे. हा बेड इतर वेळेस भिंतीवर जाऊन रुम मोकळी राहते व त्यावेळेस हि जागा मुलांना खेळण्यासाठी, गेटटुगेदरसाठी वगैरे वापरता येते .रिमोटवर देखिल वाॅलबेड आॅपरेट करता येतो.

गेस्टबेडरुमचे स्टोरेज बनवताना त्यातील थोडा भाग पाहुण्यांच्या स्टोरेज साठी ठेऊन उर्वरीत भाग जास्तीचे कपडे, बेडशीट्स, मुलांची खेळणी व इतर अनेक रोज न लागणाऱ्या वस्तुंसाठी डिझाइन करून वापरता येतो. वाॅर्डरोबचे डिझाईन देखिल वाॅर्डरोब न वाटता पॅनेलींग वाटेल अशा पद्धतीने केल्यास रूम मोकळी दिसण्यास मदत होते.

बेडसमोर टिव्ही साठी सोय असल्यास त्याच्या बाजुलाच स्टडी टेबल अथवा लगेज रॅकसाठी शेल्फ बसवल्यास सामान त्यावर ठेवण्यासाठी व वापरण्यासाठी उपयुक्त ठरते. खिडकीजवळ जागा असल्यास दोन छोट्या खुर्च्या व काॅफी टेबल ठेवल्यास उत्तम!

अशी बडदास्त पाहुण्यांची ठेवल्यावर तुमचे पाहुणे तर खुश होतीलच व त्यांचे स्वागत करण्याचा तुमचा आनंद देखिल द्विगुणीत होईल आणि अतिथी देवो भव हि उक्ती सार्थ ठरेल.

 

तनुजा योगेश राणे

इंटिरियर डिझाइनर