Tanuja and associates
A 703 Divya Smit, Next to Blue Empire Complex,
Bandar Pakhadi Road, Kandivli (W), Mumbai, Maharashtra 400 067
India
Advance Kitchen | Tanuja And Associates Blogs

Blogs

Advance Kitchen

आधुनिक किचन

In Interior / by Tanuja Rane

किचन म्हणजे प्रत्येक गृहिणीचा जिव्हाळ्याचा विषय. घराचे इंटिरिअर करताना देखिल प्रत्येक गृहिणीचे लक्ष आपले किचन माॅडर्न कसे होईल याकडेच असते.

किचनचे इंटिरिअर करताना सर्वात महत्वाचे म्हणजे किचनचे प्लानींग. किचनमध्ये शेगडीची जागा, सिंकची जागा व फ्रिज किंवा भाजीपाला ठेवण्याची जागा ह्यांचा समन्वय साधण्यासाठी वर्किंग ट्रॅंगल निर्माण होणे महत्वाचे असते.किचन मधील कामे जलद गतीने होण्यास याचा नक्कीच उपयोग होतो.किचन प्लॅटफॉर्ममध्येएल् शेपचा प्लॅटफॉर्म, पॅरलल प्लॅटफॉर्म व आयलॅंड किचन प्लॅटफॉर्म असे विविध पर्याय अपलब्ध आहेत. शहरात पॅरलल प्लॅटफॉर्म वापरायला सुटसुटीत व सर्व जागेचा पुरेपुर उपयोग करून देणारे ठरतात.

किचन प्लॅटफाॅर्मच्या टाॅपसाठी ग्रेनाईट, क्वार्टझ, जीफोर, कोरीयन असे विविध पर्याय ऊपलब्ध आहेत. पुर्वीपासून ग्रेनाईट हा उत्तम पर्याय मानला जातो, परंतु त्यात बहुतांशी डार्क रंग उपलब्ध असल्याने माॅडर्न किचनसाठी क्वार्टझ, जीफोर, कोरीयन वापरणे हा उत्तम पर्याय ठरू शकतो.

किचन टाॅपच्या रंगाच्या विरुद्ध रंगाच्या टाईल्स प्लॅटफाॅर्मवर उठून दिसतात. किचनला डिझायनर लूक देण्यासाठी व्हाईट टाॅप असलेल्या प्लॅटफाॅर्मवर मोरक्कन, रस्टीक किंवा ब्राईट कलरच्या टाईल्सचा वापर करता येईल. किचन सिंकसाठी पारंपरिक स्टीलसोबत क्वार्टझ मधे देखील सींक उपलब्ध आहेत. प्लॅटफॉर्मच्याजागेनुसार सिंकची साईझ ठरवली जाते. प्लॅटफॉर्मच्या वर दोन फुटापर्यंत टाईल्स लावून सिलींगपर्यंत ओव्हरहेड स्टोरेज बनवली जातात. त्याचबरोबर ग्लास प्रोफाईल शटर्सचा वापर केल्यास किचनला अधिक शोभिवंत बनवता येते यात किचनचे भरपुर स्टोरेजही मावु शकते.

किचनमधे टाॅल युनिट असल्यास त्यात मायक्रोवेव, ओव्हन, मिक्सर अशा किचनमधे लागणाऱ्या वस्तु एकत्र ठेवतां येतात. प्लॅटफॉर्मच्या खाली शटर्स व ड्राॅवर्सची उत्कृष्ट योजना करुन त्यात देखील भरपुर भांडी व डबे ठेवता येतात.

शेगडीमधे कुकटाॅप किंवा हाॅब तुमच्या सोयीनुसार तुम्ही घेवू शकता तसेच ग्लास टाॅप, स्टील फिनिश, चार बर्नरस् पाच बर्नरस् असे पर्याय व डिझाईन्स ह्यात उपलब्ध आहेत, शेगडीवर चिमणी मॅचिंग घेता येते. चिमणी लावल्यास डक्टींग आवश्यक असते.

किचन कॅबीनेटसचा रंग व प्लॅटफॉर्मच्या खालील कॅबीनेटसचा रंग तुमच्या किचनच्या कलर स्किमप्रमाणे ठरवता येतो. किचन प्लॅटफॉर्मचा टाॅप जर व्हाईट रंगाचा असल्यास ब्राईट टाईल्स, व्हाईट किचन कॅबीनेटस् व डार्क कलरचे ड्राॅवर्स असे काॅम्बीनेशन छान दिसेल.किचनला ट्रेंडी लूक देण्यासाठी कलरफुल किचनअॅक्सेसरिज चा वापर करु शकता.

अशा माॅर्डन किचनमधे काम करण्यासाठी गृहीणींना नक्कीच उत्साह निर्माण होईल व चविष्ट स्वयंपाकाची लज्जत देखील सर्वांनाच मिळेल.

 

तनुजा योगेश राणे

ईंटिरिअर डिझायनर