Tanuja and associates
A 703 Divya Smit, Next to Blue Empire Complex,
Bandar Pakhadi Road, Kandivli (W), Mumbai, Maharashtra 400 067
India
Utilization of Space | Tanuja And Associates Blogs

Blogs

Utilization of Space

वाॅल-बेड जागेची बचत

In Interior / by Tanuja Rane

वाॅल-बेड जागेची बचत
मे महिना हा खरंतर पुर्वी पाहुण्यांचा महिना मानला जायचा. मुलांच्या सुट्टीत एकमेकांच्या घरी जाणे व्हायचे, तेंव्हा घरात जरी जागा कमी असली तरी मनांत भरपुर जागा असल्यामुळे सर्वांना सामावून घेतले जायचे. कालांतराने हे सर्व कमी झाले. शहरात जागांचे भाव गगनाला भिडल्यामुळे घरामधे गेस्ट रुम असणे ही एक लक्झरी ठरु लागली. मोठ्या आकाराच्या घरात गेस्टरुम बनविणे शक्य आहे परंतु मध्यम आकाराच्या घरात कधीतरी येणाऱ्या पाहुण्यांसाठी एक रुम केवळ गेस्ट रुम न ठेवतां तिचा वापर इतर गोष्टींसाठी सुद्धा करणे शक्य हाेऊ लागले ते वाॅल बेडमुळे.

ह्या वाॅलबेडचे सर्व लोखंडी फिटिंग्ज प्लायवुड lमधे पॅनलिंग करुन कव्हर झाल्यामुळे समोर दिसताना हा बेड आहे असे न वाटतां त्याला सुंदर पॅनलिंग चा लूक तुम्ही त्याला देऊ शकता. हा बेड उघडल्यावर नेहेमीच्या बेडप्रमाणे डबल बेड किंवा सिंगल असल्यास सिंगल बेड तयार होतो. रिमोट कंट्रोल ने देखील हा बेड तुम्ही उघडू शकतां. सिंगल बेड व डबल बेड अशा दोन्ही आकारमानाचा बेड आपण बनवु शकतो. आता ज्या गोष्टीमुळे आपल्या रुममधील जास्तीत जास्त जागा व्यापली जाते तो बेडच भिंतीवर गेल्यामुळे राहीलेल्या जागेचा वापर स्टोरेज, स्टडी टेबल, लायब्ररी अशा विविध गोष्टींसीठी होऊ शकतो शिवाय मोकळी जागा असल्यामुळे ही रुम मुलांसाठी प्लेरुम म्हणूनही रुपांतरीत होऊ शकते.

प्रत्येकाच्या गरजा वेगवेगळ्या असतात त्यामुळे त्यानुसार डिझाईन करुन जागेचा पुर्ण वापर करुन घेणे शक्य होते. आता हेच बघा ना केवळ आपल्या आजारी जीवलग मित्राला त्याच्या हाॅस्पिटल बेडसहित कधीतरी आपल्या घरी राहता यावे म्हणून हा वाॅल बेड मी एका क्लायंटच्या साठी डिझाईन केला. इतर वेळी ह्या वाॅलबेड समोर दोन आरामदायी खुर्च्या ठेवल्याने वाॅलबेडला पॅनलिंग चा लूक आला आहे. बाकी त्याला मॅचिंग पेस्टल कलरस्कीममधे एक वाॅर्डरोब, ड्रेसिंग टेबल व टीव्ही ची सोय केल्यामुळे गेस्ट बेडरुमच्या सर्व गरजा पुर्ण झाल्या आहेत. खिडकीजवळील बीम थोडा खाली असल्यामुळे त्याला झाकण्यासाठी थोडे खाली सिलिंग डिझाईन वाॅर्डरोब वरील ग्रुव्ज चे डिझाईन सिलींगवरही करुन पुर्ण डिझाईन मधील सातत्य जपले आहे. पेस्टल ग्रीन शेडमुळे गेस्टरुमला एक आल्हाददायक शांतपणा लाभून घरी येणाऱ्या पाहुण्यांना त्याचा उपयोग होईल हे नक्की.

तनुजा योगेश राणे
इंटिरियर डिझायनर