Tanuja and associates
A 703 Divya Smit, Next to Blue Empire Complex,
Bandar Pakhadi Road, Kandivli (W), Mumbai, Maharashtra 400 067
India
Royal Living Dining area | Tanuja And Associates Blogs

Blogs

Royal Living Dining area

राजेशाही लिव्हींग डायनिंग

In Interior / by Tanuja Rane

राजेशाही लिव्हींग डायनिंग
आपले घर इतरांपेक्षा वेगळं, राॅयल दिसावं असे प्रत्येकालाच वाटत असतं त्यामुळे ४०० फ्लॅट्स असलेल्या सोसायटी मधे आपले घर उठून दिसायला पाहिजे असं माझ्या क्लायंटला वाटणे स्वाभविक होते, त्याला कारण ही तसेच होते दोन टु बीएचके फ्लॅटस् एकत्र करुन एक ४ बीएचके फ्लॅट बनवायचा होता. चार बेडरुम्स तर झाल्या व दोन लिविंगरुमस् व एक किचन लिविंगरुम मधे समाविष्ट केल्याने एक प्रचंड मोठी प्रशस्त लिवींग-डायनिंग एरीया तयार झाली. संपुर्ण घर व्हाईट थीमवरच पाहिजे असा क्लायंटचा आग्रह होता म्हणुन त्यादृष्टीने डिझाईन करायला सुरवात केली.
घर डिझाईन करताना घरातल्या सर्व व्यक्तींची मते जाणून घेणे फार महत्वाचे असते त्यामुळे प्रत्येकाच्या मनातल्या त्यांच्या घराविषयीच्या कल्पना, गरजा माहिती होतात व त्यानुसार अाधीच विचार करुन डिझाईन मधे त्या गोष्टींचा समावेश केल्याने काम सुरु झाल्यानंतर डिझाईन मधे बदल होण्याचा व्याप टाळतां येतो. थ्री डायमेन्शनल व्ह्यु तयार करुन ते क्लायंटला दाखविल्यामुळे आपले घर कसे दिसणार याची आधीच पूर्ण कल्पना क्लायंटला येते.
ह्या प्रशस्त लिव्हींग-डायनिंग रुमचे प्लानिंग करताना किचन जवळील जागा डायनिंग साठी निश्चित केली व बाकी लिव्हींगरुममधे दोन फाॅर्मल सिटिंग व लायब्ररी एरीया बनविण्याचे ठरविले.

सर्वप्रथम फ्लोअरींग साठी व्हाईट सतवारीयो मार्बलची निवड केली, ह्या ईटालियन मार्बलची ग्रेस वेगळीच असते, त्यामुळे घराला एलिगन्स प्राप्त झाला, ईल्क्ट्रीकल व फाॅलसिलींगचे डिझाईन करताना डायरेक्ट व ईनडायरेक्ट लाईटस् चा वापर करुन त्या जागेची भव्यता कुठेही कमी होणारं नाही याची काळजी घेतली.
डायनिंग टेबलासाठी किचन च्या दरवाजा शेजारीच साईड बोर्ड व क्राॅकरी युनिटची व्यवस्था असल्याने सर्विंगसाठी ते उपयुक्त ठरते. संपूर्ण लिव्हिंग-डायनिंग एरीयासाठी व्हाईट कलर लॅमिनेशन चा वापर केल्याने जागेचा रीचनेस वाढवण्यास मदत झाली. डायनिंग टेबल समोर बॅकड्राॅपसाठी मिररस् चा वापर करून पॅनल तयार केले.

लिव्हिंग एरीयात दोन सिटिंग साठी व्हाईट सोफा सेट जरी वापरले असले तरी त्याबरोबर लाउंजर व चेअर्स मधे हायलायटर कलरचा वापर केल्याने त्या जागेला एक फ्रेशनेस प्राप्त झाला. डायनिंग टेबल, सेंटर टेबल मेक टु आॅर्डर बनवुन घेतले व त्यात स्टील ईन्ले वर्कचा वापर केला व त्यालाच मॅचिंग स्टील व सिरॅमिकचे वाॅल म्युरल भिंतीवर आर्टिस्टकडुन बनवुन घेतले. बेडरुमकडे जाणाऱ्या पॅसेज डोअरची फ्रेम खास विनियरमधे बनवुन त्यांवर तीन बॅकलीट स्टीलच्या लेझर कटआऊट चे डिझाईन केले.
मेनडोअर चे डिझाईन करताना व्हाईट कलर लॅमिनेशन सोबत ईनडायरेक्ट लाईटस् चा वापर केल्याने त्या दाराला माॅडर्न लूक आला. टीव्ही युनिट व मेन डोअर शेजारील स्टेप्सचे युनिट संपूर्ण घराला साजेसे डिझाईन केले त्यामुळे पुर्ण लिव्हिंग-डायनिंग एरीयाची हार्मनी कायम राहून एक राॅयल माॅडर्न लिव्हिंग रुमची निर्मिती झाली.

तनुजा योगेश राणे
लक्झरी इंटिरियर डिझायनर