Tanuja and associates
A 703 Divya Smit, Next to Blue Empire Complex,
Bandar Pakhadi Road, Kandivli (W), Mumbai, Maharashtra 400 067
India
Expansive Bedroom | Tanuja And Associates Blogs

Blogs

Expansive Bedroom

प्रशस्त बेडरुम

In Interior / by Tanuja Rane

प्रशस्त बेडरुम


आजच्या धावपळीच्या जगात मन:शांती ही काळाची गरज ठरली आहे. मन:शांतीसाठी शांत झोप आवश्यक असते. गतीमान व धकाधकीच्या जीवनशैलीत दिवस व्यतीत केल्यावर शांत झोपेसाठी आवश्यक असते ती हक्काची आरामदायी बेडरुम. बेडरुमचे इंटिरियर आपल्या आवडीचे व व्यकीमत्वास साजेसे असणे त्यासाठीच आवश्यक ठरते.
ग्रॅफाॅलाॅजीमधे जसे अक्षरावरुन माणूस ओळखतां येतो त्यप्रमाणे एखाद्याचे घर बघून घरातल्या व्यक्तींबद्दल आपण कयास बांधु शकतो.

ही बेडरूम डिझाईन करताना आधीच प्रशस्त असलेली ही बेडरुम अधिक मोठी कशी दिसु शकेल हा विचार मनांत ठरवूनच फ्लोटींग ह्या कन्सेप्टवर डिझाईन करायला घेतले. ही बेडरुम प्रशस्त असल्याचे कारण होते की एक बेडरुम व किचन मिळुन ही बेडरुम तयार झाली होती. दोन रुम मधील भिंत जरी काढली असली तरी बीम मधे होता म्हणून बेडरुमचे प्लॅनिंग करताना बेडरुमच्या दरवाजा जवळ जास्तीत जास्त स्टोरेज देऊन तिथेच ड्रेसिंग टेबलची देखील व्यवस्था केली वाॅर्डरोबची मधली स्टोरेज शटर्स ग्लास प्रोफाईलची व बाजुची विनीयर मधे बनविण्यात आली त्यामुळे व्हाईट व विनियर संयोगाचे डिझाईन तयार झाले.

ह्या मधे रोजच्या व बाहेरच्या कपड्यांच्या स्टोरेज व्यतिरिक्त पर्सेस, शुज, बॅग्ज ठेवण्यासाठी अॅक्सेसरीज स्टोरेजची देखील व्यवस्था केली. ड्रेसिंग मिरर हे दोन एरीयामधील पार्टिशन म्हणुन डिझाईन केले पण ते जमीनीपर्यंत खाली न नेतां फ्लोटिंग म्हणजे आधांतरी ठेऊन वरच्या बीमला जोडले त्यामुळे वुडन फ्लोरींगची अखंडता कायम राहील्याने रुम प्रशस्त दिसु लागली. मिरर पार्टिशन च्या मागील बाजुचा वापर टीव्ही युनिटसाठी केल्याने बेडसमोर टीव्हीची व्यवस्था झाली. बेड व साईड टेबलचे डिझाईन देखील फ्लोटिंग स्टाईलने केल्याने डिझाईन मधील सातत्य कायम राहिले. बेड साईड टेबल व बाकी इतर ठिकाणी व्हाईट फिनिशींगसाठी कोरीयन या मटेरिअलचा वापर केला. कोरीयन चे वैशिष्ट्य असे आहे की काही वर्षांनी पुन्हा बफींग केल्यावर परत ते नव्यासारखे दिसु शकते. खिडकीजवळ बैठकीची व्यवस्था असल्यामुळे पुर्ण पडदे न घेता डिझायनर रोलर ब्लाईंडचा वापर केला. बेडच्या हेडबोर्ड कुशनिंग असलेला व त्यामागे ईनडायरेक्ट लाईटची व्यवस्था करुन वाॅलपेपर लावल्याने सुंदर अॅंम्बीयन्स निर्माण झाला. नॅचरल वुडन फ्लोरींगने ह्या न्युट्रल कलर पॅलेटच्या बेडरुमला छान बॅकड्राॅप दिला व एक प्रसन्न व आरामदायी बेडरुम तयार झाली. मन:शांती व शांत झोप लागण्यासाठी अजुन काय हवे ?


तनुजा योगेश राणे
इंटिरियर डिझायनर