Tanuja and associates
A 703 Divya Smit, Next to Blue Empire Complex,
Bandar Pakhadi Road, Kandivli (W), Mumbai, Maharashtra 400 067
India
Personalised Bedroom | Tanuja And Associates Blogs

Blogs

Personalised Bedroom

पर्सनलाइज्ड बेडरूम

In Residential Interior / by Tanuja Rane

बेडरूम मग ती मास्टर बेडरूम असो, पेरेन्टस्  बेडरूम असो किंवा मुलांची बेडरूम असो प्रत्येकाची पर्सनल स्पेस जोपासणारी हक्काची जागा असते. त्यामुळे बेडरुमचे इंटिरियर करताना ती वापरणाऱ्या व्यक्तीच्या आवडीनिवडी व सवयींचा विचार करणे महत्त्वाचे असते.

बेडरुमच्या आकारमानानुसार बेडची साईज ठरवावी लागते. तसेच बेडचे डिझाईन निवडताना स्लीक डिझाईन निवडल्यास बेडरूम मोकळी दिसते. बेडच्या साईडस् ला कुशनिंग करण्याचा हल्ली ट्रेंड आहे. त्यामुळे बेडची साईड व हेडबोर्डचे कुशनिंग मॅचिंग करुन उत्तम रंगसंगती साधतां येते. बेडच्या साइड टेबलसाठी देखिल मॅचिंग डिझाइन करता येते. बेडच्या मागील भिंतीच्या सजावटीला खुप महत्त्व आहे त्यासाठी हल्ली पॅनलिंग, वाॅलपेपर, टेक्शचर, क्लॅडींग असे विविध पर्याय उपलब्ध आहेत. बेडवरील बेडकव्हर व कुशन्स तुमच्या रंगसंगतीला अधिक उठावदार बनवते. बेड समोरील टीव्हीच्या मागील भिंतीलाही वाॅल पॅनलिंगचा वापर करुन आकर्षक बनवतां येते.

बेडरुमच्या फाॅलसिलींग मधे डायरेक्ट, इनडायरेक्ट व मुड लाईटींगचा वापर करुन छान ॲंबीयन्स निर्माण करता येतो. साईड टेबलच्यावर लावलेली हॅंगींग किंवा वाॅल लाईट्स बेडरुमची शोभा वाढवतात.

बेडरूमच्या कलरस्कीमचा विचार करताना ती रुम वापरणाऱ्या व्यक्तींच्या आवडीचा रंग लक्षात घेऊन त्या रंगांचा समावेश असलेली कलर पॅलेट वापरावी. शक्यतोवर पेस्टल कलर शेडस् असावेत. एखादा उठावदार रंग आवडत असल्यास त्या रंगांचा वापर हायलाईटर म्हणून कुशन्स आणि ॲक्सेसरीज मध्ये वापरु शकतो. बाकी पेस्टल कलर शेडस् ह्या कर्टनस्, बेडकव्हरस् मध्ये वापराव्यात, शक्यतोवर भिंतींचा रंग पांढरा किंवा हलक्या रंगाचाच ठेवावा त्यामुळे बाकी सर्व गोष्टींना ऊठाव मिळतो.

वाॅर्डरोबमध्ये प्लायवुडमध्ये बनवलेले बाहेर उघडणारे दरवाजे किंवा ग्लास प्रोफाईल स्लाईडिंग दरवाजे असे पर्याय उपलब्ध आहेत. दरवाजे प्लायवुड वापरुन बनवायचे असल्यास वुडन व व्हाइट अशा काॅम्बीनेशनचा वापर करु शकतो. ग्लास स्लाईडिंग दरवाजे असल्यास कुठल्याही पेस्टल शेडस् ची ग्लास बनवता येते व हे दरवाजे व्हाईट अथवा वुडन वाॅर्डरोबच्या फिनिशींग बरोबर छान दिसतात. शिवाय हे दरवाजे वापरायलाही सोपे असतात.

अशी ही बेडरुम तुमच्या सर्व आवडीनिवडी व सवयींचा विचार करुन डिझाईन केलेली असेल तर नक्कीच तिला तुमचा पर्सनलाईज्ड टच मिळेल आणि दिवसातले ८ ते १० तास आपण जिथे व्यतीत करतो ती जागा जास्तीत जास्त आरामदायक, मनाला शांतता देणारी व उल्हासपुर्ण असेल तर ती वापरायला प्रत्येकालाच नक्की आवडेल. 

 

तनुजा योगेश राणे

इंटिरियर डिझाइनर