Tanuja and associates
A 703 Divya Smit, Next to Blue Empire Complex,
Bandar Pakhadi Road, Kandivli (W), Mumbai, Maharashtra 400 067
India
New festival, new trends | Tanuja And Associates Blogs

Blogs

New festival, new trends

नवे पर्व, नवे ट्रेंड्स

In Interior / by Tanuja Rane

नविन वर्ष नेहमीच नवी नवलाई आणि आपल्यासाठी नवा उत्साह घेऊन येते. अनेक नविन संकल्प आपण नविन वर्षात मांडत असतो.त्यात घराच्या इंटेरीयर मध्ये थोडेफार बदल करणे हे देखील असते कारण आपण जेव्हा आपल्या घराचा विचार करतो तेव्हा आपल्याला वाटु लागते की आपले घर नेहमीच नवे वाटले पाहिजे , ते ट्रेंडी दिसायला हवे , आऊट आॅफ स्टाईल नाही वाटले पाहिजे. 

इंटेरीयर डिझायनींगच्या  विश्वात अनेक ट्रेंड्स येतात आणि जातात पण काही गोष्टी मात्र अश्या असतात की त्या कधीच आउट आॅफ ट्रेंड किंवा आउट आॅफ स्टाईल होतं नाहीत. त्यात सर्वात प्रथम क्रमांक येतो तो इंटिरियर मधे होणारा लाकुड व विनियरचा वापर. कित्येक वर्षांपासून लाकुड किंवा त्यापासुन बनलेल्या वस्तुंनी इंटिरियर मधे अव्वल स्थान मिळवले आहे. संपुर्ण घरात लाकडाचे अथवा विनियर वापरुन करुन केलेले फर्निचर असो किंवा पुर्ण घरात केवळ वुडन सिलिंग अथवा वुडन फ्लोरींग असो लाकडाचा वापर तुमच्या घराला एक कोझी फिल देऊन जातो. ह्या वर्षी देखिल लाकुड किंवा विनीयर वापराचे प्रमाण इतर फीनिशींग मटेरियल पेक्षा जास्तच असेल.

फिनिशींगसाठी निरनिराळ्या मटेरिअलचा वापर केला जातो. लेदर किंवा रेक्झीनचा वापर फक्त सोफा, खुर्चीपुरता मर्यादित राहिला नसुन बेडस् च्या साईडस्, कॅबिनेटची शटर्स कव्हर , वाॅल पॅनेलींग करण्यासाठी देखील ह्या गोष्टींचा वापर होऊ लागला आहे. 

बोल्ड कलर पॅटर्न्सचा वापर देखील ह्या वर्षीच्या इंटिरियरच्या ट्रेंडमधे असेल त्यामुळे संपूर्ण व्हाईट किचन आणि बोल्ड कलर पॅटर्नच्या किचन टाईल्स एकदम ट्रेंडी वाटतील. आर्ट डेको स्टाईल ह्या वर्षी जास्तीत जास्त इंटिरियर ट्रेंड मधे असेल.

ह्या वर्षी डार्क ब्ल्यु कलर चा खुपच वापर इंटिरियरमधे होईल तसेच मिक्स मटेरियल जसे स्टील, गोल्ड, रोझ गोल्डच्या लेझर कट मेटल डिझाईनचा वापर करून तुमचे इंटिरियर लक्झरी करता येईल.

घराच्या इंटिरियर मधे नैसर्गिक झाडांचा वापर करुन उदा. थोडी मोठी झाडे असलेल्या डेकोरेटिव्ह कुंड्या तुमच्या घराच्या डेकोरचा भाग होऊ शकतील त्यामुळे आपोआपच ग्रीन कलर तुमच्या डेकोरमधे सामील होऊन जाईल.

ह्या सर्व गोष्टींमधुन एक गोष्ट लक्षात येतेय की आपण निसर्गाच्या जास्तीत जास्त जवळ जाण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यामुळे अजुनही आपल्याकडे हेच ट्रेंड परत फिरुन फिरुन येणार आणि आवडणारही. चला तर मग विचार सुरु करुया की आपल्या घराचे इंटिरियर खरच ट्रेंडी आहे का?

 

तनुजा योगेश राणे

इंटिरियर डिझाइनर