Tanuja and associates
A 703 Divya Smit, Next to Blue Empire Complex,
Bandar Pakhadi Road, Kandivli (W), Mumbai, Maharashtra 400 067
India
My Beautiful home | Tanuja And Associates Blogs

Blogs

My Beautiful home

सुंदर माझे घर

In Interior / by Tanuja Rane

इंग्रजी भाषेत घरासाठी होम व हाऊस असे दोन शब्द आहेत पण आपल्यासाठी घर म्हणजे घरच कारण घर म्हणजे आपलेपणा, प्रेम, सहानुभुती, परस्परांना समज़ुन घेण्याची वृत्ती, मन मोकळे करण्याची तसेच मनातील मरगळ झटकून टाकणारी जागा. असे आपले घर अधिकाधिक सुंदर कसे दिसेल याचा विचार करणे म्हणूनच आवश्यक ठरते. 

प्रत्येकालाच कुठल्या न कुठल्या कलेची आवड ही असतेच आणि ही आवड तुमच्या घरातील वस्तु संग्रहावरुन लगेच दिसुन येते. अनेक ठिकाणी प्रवासाला गेल्यावरही आपण बऱ्याच वस्तु घरासाठी म्हणून विकत आणतो. नुसत्या भरमसाठ वस्तुंचा संग्रह केला म्हणून घर सुंदर दिसेलच असे नाही तर त्या जागेवर ती वस्तु शोभून दिसणे, आकार त्या जागेनुसार असणे, रंग घरातील कलरस्कीमला जुळणारा असणे हे देखील महत्वाचे असते. 

घर सुंदर दिसण्यासाठी घरातील फर्निचर बरोबरच शोभेच्या वस्तु म्हणजेच आर्टिफॅक्ट्स किंवा ॲक्सेसीरीजला फार महत्व आहे. घरातील प्रत्येक रूमचा एक फोकल पाॅइंट असतो त्यामुळे त्या रूममध्ये जाताच तो आपले लक्ष वेधुन घेतो. घरातील नाविन्यपुर्ण फर्निचरमध्ये जिवंतपणा आणण्याचे व फोकल पाॅइंट बनण्याचे महत्वपुर्ण काम आर्टिफॅक्ट्स करत असतात.

घराच्या लिव्हींगरूम अथवा बेडरुमच्या साईड टेबलावर फुलदाणीत ठेवलेली ताजी किंवा कृत्रिम फुले तुमच्या मनाला टवटवीत ठेवावयास कारणीभूत ठरतात. लिव्हींगरूम मध्ये सोफ्याच्या काॅर्नर टेबल शेजारी ठेवलेला उंच लॅम्पशेड किंवा पाॅट लक्ष वेधुन घेतो. सेंटरटेबलच्या खाली अंथरलेले गडद रंगाचे कार्पेट तुमचा सोफा सिटींग एरीया आकर्षक बनवतो. सोफ्यावर ठेवलेल्या गडद रंगाच्या गोल्ड किंवा सिल्वर वर्क असलेल्या कुशन्स तुमच्या इंटेरियरला राॅयल लुक देऊन जातात. भिंतीवर लावलेले मोठे पेंटिंग किंवा म्युरल तुमच्या घराचा फोकल पाॅइंट ठरू शकतो. गडद रंगातील एखादी मुर्ती अथवा पाॅट घराचा मोकळा कोपरा सुशोभीत करून टाकतो.हल्ली लाइट आणि शॅडो यांचा वापर करून देखिल छान वाॅलआर्ट तयार करता येते.

हे सर्व जरी असले तरी आर्टिफॅक्ट्स खरेदी करताना त्याची प्रमाणबद्धता म्हणजेच त्याचे प्रपोर्शन फार महत्वाचे आहे. उदाहरंणार्थ भिंतीच्या आकाराच्या हिशोबाने पेंटिंग अथवा म्युरलचा आकार असणे आवश्यक आहे. अशाप्रकारे तुमच्या इंटेरियरच्या स्टाईल नुसार आर्टिफॅक्ट्सचा वापर केल्यास तुमचे घर नक्कीच अधिकच सुंदर दिसु लागेल.

 

तनुजा योगेश राणे

इंटिरियर डिझाइनर