Tanuja and associates
A 703 Divya Smit, Next to Blue Empire Complex,
Bandar Pakhadi Road, Kandivli (W), Mumbai, Maharashtra 400 067
India
Magic of Blue | Tanuja And Associates Blogs

Blogs

Magic of Blue

निळ्याची किमया

In Interior / by Tanuja Rane

निळ्याची किमया
सकाळी उठल्यावर निळ्याशार सागराकडे पाहिल्यावर जो प्रसन्नपणा जाणवतो तो अनुभव ही बेडरूम वापरणाऱ्या माझ्या क्लाईंटना रोज देता आला तर ? ही कल्पना मनांत घेऊन ही ब्ल्यु बेडरूम मी डिझाईन करायला घेतली. मनाला शांती आणि स्फुर्ती देणारा रंग म्हणजे निळा रंग ! मनाच्या आंतरीक शांतीसाठी बेडरूम मधे निळ्या रंगांचा वापर केला जातो हे जरी खरे असले तरी जास्त प्रमाणात डार्क रंगाचा वापर रूमच्या डेकोरला मारक ठरू शकतो त्यामुळे ती परफेक्ट “ मेरा वाला ब्ल्यु “ ची शेड कलर लॅमीनेशन मध्ये तयार करण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागली आणि हीच ती पेस्टल ब्ल्यु शेड मग मी संपुर्ण बेडरुमसाठी वापरली. ह्या रुम मधील बेड चा हेडबोर्ड व बेडच्या साईडस् ना डार्क ब्ल्यु कलरचे फॅब्रीक वापरून कुशनिंग केले आहे. बेडच्या साइड्सला कुशनिंग केल्यामुळे बेडचा काॅर्नर पायाला लागण्याचा प्रश्नच येत नाही शिवाय फॅब्रीक किंवा लेदरमध्ये अनेक रंगांचे पर्याय तुमच्याकडे उपलब्ध होतात.

बेडच्या मागील भिंतीवर पेस्टल ब्ल्यु पार्श्वभुमी वर व्हाईट स्ट्रिप्स व प्रोफाईल लाईटसचे काॅम्बीनेशन करुन छान पॅनलिंगचे डिझाईन केले आहे, बेडरूम समोरील भिंतीवर फक्त टीव्ही साठी पॅनलिंग करण्याएैवजी पूर्ण वाॅलवरच पॅनलिंगकरून टिव्हीसाठी स्टडीटेबलसाठी व त्याला बॅलन्स करायला अजुन एक कोनाडा व तीन कोनाडे बनवुन त्यात छान डिझाईनचा वाॅलपेपर वापरल्यावर त्या भिंतिचे रुपच पालटले आणि एक सुंदर मनोवेधक डिझाईन तयार झाले. त्याच वाॅलपेपरच्या डिझाईनला मॅचिंग पडदे शोधले त्यामुळे डीझाईनमधे एकसारखेपणा आपोआपच आला.बेडरूमच्या फाॅलसिलींगच्या स्लीटमध्ये देखिल त्याच वाॅलपेपरचा वापर केला आहे. व्हाइट सतवारीयो मार्बलमुळे संपुर्ण बेडरुमला ग्रेसफुलनेस प्राप्त झाला आहे.
ह्या प्रोजेक्टमध्ये दोन बेडरुम मिळुन एक बेडरुम बनवायची असल्याने एकात प्रशस्त बेडरुम व दुसऱ्यात वाॅर्डरोब व ड्रेसिंग एरीया डिझाईन केला आहे.. ह्या वाॅर्डरोबच्या शटर्ससाठी हीच ब्ल्यु थीम कायम ठेवली पण एकच ब्ल्यु शेड न ठेवतां ब्ल्यु कलरच्या वेगवेगळ्या शेडस् चा ग्रेडेशनमधे वापर केल्याने तो एरीया जास्त ईंटरेस्टींग झाला. वाॅर्डरोबच्या दरवाजांसाठी हॅंडलस् देखील साईटवरच बनवली. ओपन ड्रेसिंग टेबल डिझाईन व बेडरुमच्या दरवाजाच्या आतल्या बाजुने केलेल्या ब्ल्यु ग्रेडेशन शेडस् च्या पट्ट्यांनी ह्या डिझाईनची खरोखरच पुर्तता झाली.

तनुजा योगेश राणे
इंटिरियर डिझायनर