Tanuja and associates
A 703 Divya Smit, Next to Blue Empire Complex,
Bandar Pakhadi Road, Kandivli (W), Mumbai, Maharashtra 400 067
India
Living Dining area | Tanuja And Associates Blogs

Blogs

Living Dining area

लिव्हींग डायनिंग एरिया

In Interior / by Tanuja Rane

लिव्हींग डायनिंग एरिया
घर ही गोष्ट नुसत्या दगड विटांनी बांधली जात नाही, जिव्हाळ्याच्या व प्रेमाच्या धाग्यांनी बांधले जाते. जिथे प्रेमाची उब जाणवते तेच खरे घर असं जरी म्हटले जात असले तरी आपल्या स्वप्नातलं घर साकार होण्यासाठी मेहनत ही भरपुर घ्यावी लागते. अशा घराला सजवण्याच्या कामात इंटिरियर डिझाइनिंगचा खरा कस लागतो.
घरांचे निरविराळे प्रकार असतात काही वनबीएचके, काही टू तर काही थ्री, फोर बीएचके सुद्धा असतात. मात्र जेव्हा दोन टु बीएचके फ्लॅटस् एकत्र करुन एक मोठे घर बनवायचे असल्यास त्यात प्लॅनिंगचा खुप मोठा भाग असतो कारण दोन फ्लॅटस् म्हटल्यावर दोन लिवींग रुम, दोन किचन आले, त्यांचे योग्य ते एकत्रीकरण करुन एक मोठे लिविंगरुम व दुसरे किचन कशा पद्धतीने वापरायचे ह्या सर्व गोष्टींचे व्यवस्थित प्लॅनिंग करावे लागते. मालाडमधील एका सुंदरशा सोसायटी मधील दोन टु बीएचके फ्लॅटस् एकत्र करुन एकच मोठे घर बनवायचे हे काम जेंव्हा सुरु केले तेंव्हा असेच विस्त्तृत आणि सखोल नियोजन करावे लागले होते.
या नियोजनानुसार, दोनपैकी एक किचन आम्ही एका बेडरुममधे समाविष्ट करुन तिथे वाॅकइन वाॅर्डरोबची जागा निर्माण केली व दोन लिविंगरुम एकत्र करुन स्पेशियस व लक्झरियस लिविंग- डायनिंग एरिया तयार केला. किचन वाढवतां येणे शक्य नव्हते व क्लायन्टना ओपन किचन सुद्धा नको होते अशा वेळी किचनची वाॅल काढून भरपुर प्रकाश आत येण्यासाठी ग्लास पार्टिशन करण्याचे ठरविले. लिव्हींगरुम मधुन हे ग्लास पार्टिशन दिसत असल्यामुळे ते इंटरेस्टींग करण्यासाठी बेंड ग्लास व ग्लासवर फ्राॅस्टींगच्करुन डिझाईन बनविले आणि गंमत म्हणजे हाच त्या घराचा केंद्रबिंदू ठरला.
संपुर्ण घरात ईटालियन मार्बल फ्लोअरींग वापरल्याने लिव्हींग व डायनिंग एरीया अजुनच मोठा दिसु लागला. थ्रीसीटर, टुसीटर, लाउंजर मिळुन आठ जणांच्या सीटींगची व्यवस्था शिवाय आॅटोमेन व खिडकीलगतच्या सिटींगमुळे जास्त पाहुण्यांची देखील बसण्याची सोय झाली.
जागा जास्त असल्यामुळे ६ सीटर डायनिंग टेबल देखील नेहमीपेक्षा जास्त मोठे म्हणजेच सात फुट x साडेतीन फुट आकाराचे बनविले. या मार्बल टाॅप असलेल्या डायनिंग टेबलावर मदर आॅफ पर्ल चे ईनले वर्कचे डिझाईन आहे व याच डिझाईनची पुनरावृत्ती लिव्हींग एरीयातील सेंटर टेबल साईड टेबलमधे केली आहे.
मुख्य दरवाजे देखील दोन असल्याने व दोन्ही वापरते ठेवायचे असल्याने लिव्हींगरुम मधुन दोन दरवाजे कसे दिसतील हा यक्ष प्रश्न होता. त्या दरवाजांवर आतल्या बाजुने विनीयर व मिररचे काॅंबीनेशन करुन त्याला पॅनेलींगचा लुक दिला त्यामुळे दोन दरवाजे न दिसतां ते छान पॅनेलींग दिसु लागले. घरातील सर्वांना ही कल्पना खुपच आवडली.
खिडकीजवळ सिटींग असल्यामुळे पुर्ण कर्टनस् न देता रोमन ब्लाईंडचा पर्याय निवडला, डायरेक्ट व ईनडायरेक्ट लाईटस् चा वापर करून छान एॅम्बीयन्स तयार झाला. बाकी वाॅलपेपर, आर्टीफॅक्टस्, लाईट फिटिंग्ज ह्या सर्व गोष्टी घराचा लूक वाढवण्यासाठी तर होत्याच. अशाप्रकारे घरातील सर्वांच्याच आवडीचा लिवींग डायनिंग एरिया आकाराला आला.

तनुजा योगेश राणे
इंटिरियर डिझायनर