Tanuja and associates
A 703 Divya Smit, Next to Blue Empire Complex,
Bandar Pakhadi Road, Kandivli (W), Mumbai, Maharashtra 400 067
India
House Storage Management | Tanuja And Associates Blogs

Blogs

House Storage Management

घरातील स्टोरेज मॅनेजमेंट

In Interior / by Tanuja Rane

घरातील स्टोरेज मॅनेजमेंट...
घर असावे घरासारखे ,नकोत नुसत्या भिंती
इथे असावा प्रेम जिव्हाळ्याचा ,नकोत नुसती नाती
माझे घर हा प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा विषय.त्यातही माझे हा शब्द फार महत्वाचा आहे. प्रत्येक कुटुंबाच्या गरजा, त्यात राहणाऱ्या व्यक्ती, त्यांच्या सवयी, आवडीनिवडी यावर अवलंबुन असतात. त्यामूळे एकाच बिल्डिंग मधील एकाच आकाराच्या प्रत्येक घराचं डिझाईन वेगवेगळं बनु शकतं. घराचं नूतनीकरण करतांना भरपूर स्टोरेज ची व्यवस्था असेल असं डिझाइन असले पाहिजे अशी प्रत्येक गृहिणीची अपेक्षा असते आणि ती योग्यच आहे कारण घर म्हटले कि स्टोरेज हे आलेच पण प्रत्येक वस्तु ला व्यवस्थित जागा मिळवुन देणे यात इंटिरिअर डिझायनर चे खरे कौशल्य असते, घरातल्या प्रत्येक वस्तूला तिची योग्य ती जागा मिळवुन दिली तर ती वस्तु जागेवरच जाते आणि घरात आपोआपच पसारा कमी होतो असा माझा अनुभव आहे.

घराच्या मेन डोअर पासून सुरवात केल्यास दाराजवळच शुजरॅकची आवश्यकता असते. लिव्हींगरुम हा प्रत्येक घराचा खास दर्शनी भाग त्यामुळे तिथे कमीतकमी स्टोरेज व जास्तीतजास्त बैठकीची व्यवस्था असणे आवश्यक असते. अगदीच आवश्यकता असल्यास स्टोरेज जरी बनवले तरी ते जास्त उठून दिसणार नाही याची काळजी घ्यावी. हल्ली भिंतीवर लावलेला टि व्ही व त्या खाली ड्रॅावर असलेले छोटेसे कपाट अशा प्रकारच्या टि व्ही युनिटचा ट्रेंड आहे. कमीतकमी स्टोरेजमुळे तुमची लिव्हींगरुम स्पेशस दिसते.डायनाींगसाठी वेगळी जागा असल्यास डायनाींगटेबल समोर अथवा बाजुला क्राॅकरी युनिट कम् साईड बोर्ड बनवुन त्यात क्राॅकरी ठेवण्याची व्यवस्था करता येते.खास क्राॅकरी उंच काचेच्या कपाटात शोभिवंत दिसते.

प्रत्येक गृहिणीचा किचन म्हणजे अगदी जिव्हाळ्याचा विषय असतो किचनमधे ठेवायच्या गोष्टिंची यादी तयारच असते तिच्या कडे. किचन डिझाइन करताना किचन प्लॅटफाॅर्मच्या खाली शक्य होतील तेवढे ड्राॅवर्स दिल्यास वस्तु साठवण्याबरोबरच त्या वस्तु वापरण्यासही खुप सोपे होते. किचन प्लॅटफॉर्मच्या वरील भागांत गॅस शेगडीची जागा सोडून व्यवस्थित रचना केल्यास भरपुर वस्तुंची व्यवस्था होऊ शकते.
खरी स्टोरेज ची गरज बेडरुम मधे असते. वाॅर्डरोबच्या आतील डिझाईन करताना घरातील प्रत्येक व्यक्तीच्या वयानुसार व सवयीनुसार शेल्फ व ड्राॅवर्सची रचना करुन भरपूर कपडे त्यात कसे राहतील शिवाय ते ठेवावयास कसे सोपे पडेल अशी रचना केली जाते. वाॅर्डरोबचा दर्शनी भाग बेडरुमच्या डेकोरप्रमाणे डिझाइन केल्यास ती नुसती कपाटे न वाटतां बेडरुमचे आकर्षण बनू शकतात. याशिवाय बेडरुममधे ड्रेसींग मीररच्या मागे कपाट करून अथवा खाली ड्राॅवर बनवुन ड्रेसिंग स्टोरेज करता येते. मुलांसाठी स्टडी टेबल बनवताना टेबलाच्या वर किंवा बाजुला स्टोरेज बनवून त्यात बऱ्याचशा पुस्तकांची सोय होऊ शकते. बेडरुममध्ये  स्टोरेज साठी जरी कपाटे असली तरी फिक्या रंगसंगतीचा वापर करुन बनवल्यास ती फार डोळ्यात भरत नाहित व बेडरुम मोठी दिसण्यास मदत होते.
घरात कधीतरी उपयोगी होईल म्हणून बऱ्याच गोष्टी आपण साठवतो त्यामुळे कितीही स्टोरेज केले तरी ते कमीच पडते म्हणूनच घरात नविन वस्तु घेताना जुन्या नको असलेल्या वस्तुंचीही वेगळी विल्हेवाट लावणे गरजेचे असते. हेच तर खरे स्टोरेज मॅनेजमेंटचे गमक आहे.

 


तनुजा योगेश राणे
इंटिरियर डिझाइनर