Tanuja and associates
A 703 Divya Smit, Next to Blue Empire Complex,
Bandar Pakhadi Road, Kandivli (W), Mumbai, Maharashtra 400 067
India
Grand Living Room | Tanuja And Associates Blogs

Blogs

Grand Living Room

लिव्हींग रुम: आलिशान घराची शान

In Interior / by Tanuja Rane

लिव्हींग रुम: आलिशान घराची शान


आपले घर म्हणजे आपल्या व्यक्तिमत्वाचा आरसा असतो. मी असे म्हणेन की आपली लिव्हींगरुम म्हणजे आपल्या लाइफस्टाइलचा आरसा असतो. त्यामुळेच प्रत्येक क्लायंटची मुख्य मागणी असते की लिव्हींगरुम एकदम छान झाली पाहिजे कारण तुमच्या घराचे फर्स्ट ईंप्रेशन म्हणजे तुमची लिव्हींगरुम !!
बोरिवलीतील ह्या घरात जेव्हा दोन ३ बीएचके फ्लॅटस् एकत्र करुन मोठे घर बनवायचे होते तेव्हा बिल्डरने दिलेल्या प्लानिंगनुसार प्रथम किचन व नंतर लिव्हींगरुम असे प्लानिंग असल्यामुळे दोन फ्लॅटस् एकत्र करुन देखील दोन लिव्हींगरुम एकत्र करणे शक्य नव्हते म्हणुन एक किचन व एक हाॅल मिळुन ही लिव्हींगरुम तयार झाली.
लिव्हींगरुमचा एरीया तर मोठा झाला पण मुख्य अडचण डिझाइनिंगच्या दृष्टीने ही होती की किचन असल्यामुळे सिलींग व मधला बीम खुपच खाली येत होते व शिवाय एक काॅलम देखील खुपच पुढे आलेला होता. बीम तसेच काॅलम ह्या स्ट्रक्चरल गोष्टींना हात न लावता डिझाईन मधे त्याचा वापर करुन त्या सुंदर कशा बनवतां येतील ह्यातच डिझाइनिंगचे कौशल्य दडलेले असते. ह्या लिव्हिंगरुमचे डिझाईन करताना दोन वेगळ्या सिटिंग एरीया डिझाईन केल्या. शिवाय राहिलेल्या जागेत दोन आरामदायी खुर्च्या ठेऊन तिथे एक वेगळ्या बैठकीची योजना तयार केली. तिथल्या स्टोरेजवरील भिंत मेटॅलिक कलरच्या मोठ्या टाईलने सुशोभित केली. आर्टीफॅक्टस् व रोजच्या लागणाऱ्या वस्तु ठेवण्यासाठीचे स्टोरेज दोन एरीयांना वेगळे करण्यासाठी डिझाईन केले आणि हाच त्या लिव्हींगरुमचा फोकल पाॅईंट ठरला. दोन सिटिंग अशा रीतीने नियोजित केल्या की दोन सिटींगच्या मधे तो जास्त बाहेर आलेला काॅलम असेल. त्या काॅलमला छान पॅनलींग व वुडन लाॅगज् चे डिझाईन करुन तो सुशोभित केला. ज्याठिकाणी सिलींग जास्त खाली होते तेथील सिलिंग थोडे वेगळे क्लासीकल मोल्डींग प्रकारचे डिझाईन करुन त्याला मॅच होणारे वुडन पॅनलिंग भिंतीला केले त्याचबरोबर जिथे बीम जास्त खाली होता तिथे वुडन सिलींग केल्याने त्या जागेला वेगळाच लुक मिळाला.
ह्या लिव्हींगरुमला लक्झरी फील येण्यासाठी व्हाईट सतवारीयो ह्या सुंदर ईटालियन मार्बलचा वापर तर केलाच शिवाय सेंटर टेबल, साईड टेबल व आर्टीफॅक्ट स्टोरेज मधे रोझ गोल्ड रंगाच्या मिरर चा वापर केला व टाॅप वरील मार्बलवर मदर आॅफ पर्ल चे इनले वर्क करुन घेतले. टीव्ही युनिटसाठी ओरीजिनल काॅर्कचा वाॅलपेपर वापरला. सिलींगवरील झुंबर, काॅर्नर साइड टेबलवरील हॅंगींग लाईट व ईनडायरेक्ट लाईटच्या वापराने ॲम्बियन्स तयार झाला. दोन्ही सोफासेट साठी ह्या सर्व न्युट्रल कलरस्कीमला मॅचिंग होणारे फर्निशींग व त्याच्या जोडीला एक्स्लुसीव मेन व शियर कर्टनस् सिलेक्ट करुन लक्झरी लिव्हिंगरुम तयार झाली.

तनुजा योगेश राणे
इंटिरियर डिझायनर