Tanuja and associates
A 703 Divya Smit, Next to Blue Empire Complex,
Bandar Pakhadi Road, Kandivli (W), Mumbai, Maharashtra 400 067
India
For Illuminated house | Tanuja And Associates Blogs

Blogs

For Illuminated house

प्रकाशमान घरासाठी

In Interior / by Tanuja Rane

घराची अंतर्गत सजावट करताना प्रत्येकालाच वाटत असतं कि आपले घर सुंदर दिसावे, त्याची रचना देखणी असावी, प्रशस्तपणा वाटायला हवा, समकालीन विचारांशी मिळती जुळती घराची रचना असावी पण या सर्व गोष्टींबरोबरच एक गोष्ट पण अत्यंत महत्वाची असते ती म्हणजे घरातील प्रकाश योजना.
प्रकाश योजना हा गृहसजावटीचा महत्वाचा भाग आहे.

सिलींगमधे लावलेल्या डाउन लाईट मधुन खाली पडलेला प्रकाश हा डायरेक्ट लाईट या प्रकारात मोडतो, फाॅल्ससिलींग मधे डिझाईन करुन एलईडी स्ट्रीप किंवाप्रोफाईल स्ट्रीप वापरुन प्रकाश खाली न पडता सिलींग वरच पडेल अशी व्यवस्था केली असतां छान वातावरण निर्मिती होते त्याला ईनडायरेक्ट लाईटींग असे म्हणतात.डायरेक्ट व ईनडायरेक्ट लाईटिंग वापरुन केलेल्या प्रकाशयोजनेस अॅंबीयन्स लाईटींग असे म्हणतात.निरनिराळ्या आकाराची, निरनिराळ्या मटेरीयलने बनलेली, विविध रंगांच्या लाइट्सचा पर्याय असलेली झुंबरे बाजारात उपलब्ध आहेत. त्यातील आपल्या घराच्या डेकोरला साजेसे झुंबर योग्य जागी बसवल्यास ते झुंबर तुमच्या घराचा एक आकर्षक केंद्रबिंदु ठरू शकतो. डायनिंग टेबलावर किंवा एखाद्या साईड टेबलाच्या वर लावलेले हॅंगींग लाईटस् त्या जागेचा प्रभाव अजुनच वाढवतात. एखाद्या वाॅलपेपर अथवा गडद रंग लावलेल्या भिंतीला हायलाईट करण्यासाठी वाॅलवॅाशर लाईटचा उपयोग केला जातो तर एखाद्या मुर्ती किंवा कलाकृतीला हायलाईट करण्यासाठी स्पाॅट लाईटचा वापर केला जातो. किचन कॅबिनेटच्या खाली प्रोफाईल स्ट्रीप वापरुन ओट्यावर काम करण्याची जागा प्रकाशमान करता येते. अशा प्रकारच्या प्रोफाईल स्ट्रीप लाईटस् स्टडी कॅबिनेट खाली व वाॅर्डरोबच्या आतही वापरू शकतो.

डेकोरेटीव लॅम्प शेड साईडटेबलवर ठेवल्यास लिविंगरुमची किंवा बेडरूमची शान अजुनच वाढते.अशा या प्रकाशयोजनेत अनेक प्रकारच्या लाईट्सचा अंतर्भाव असतो.

विविध प्रकारचे आणि रंगांचे लाईटस्  एकत्र करून निरनिरीळ्या मुड्स प्रमाणे उदा. टीव्ही बघण्यासाठी, पाहुण्यांच्या स्वागतासाठी, पार्टीसाठी असे सेट करून वापरतां येतात याला मुड लाईटींग असे म्हणतात. मुड लायटींग तसेच सर्व लायटींग घरातून रिमोटद्वारे  किंवा जगाच्या कुठल्याही कोपऱ्यातुन मोबईलच्या एका क्लिक द्वारे कंट्रोल करणे आॅटोमेशनमुळे आज शक्य झाले आहे.मुव्हमेंट सेंसरचा वापर बाथरूम, पॅसेज मधे केल्यास विजेची बचत होऊ शकते.
या सर्व खुबी तुम्ही तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली तुमच्या प्रकाशयोजनेत वापरल्यास तुमच्या घरात योग्य ते वातावरण निर्माण होऊन तुमचे घर प्रकाशात उजळुन निघेल व अधिकच सुंदर दिसू लागेल आणि तुम्हाला प्रत्यय येईल .......
लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया
झळाळती कोटी ज्योती या.....