Tanuja and associates
A 703 Divya Smit, Next to Blue Empire Complex,
Bandar Pakhadi Road, Kandivli (W), Mumbai, Maharashtra 400 067
India
Excellent use of colors | Tanuja And Associates Blogs

Blogs

Excellent use of colors

रंगांचा खुबीदार वापर

In Interior / by Tanuja Rane

ह्या वर्षीच्या इंटरनॅशनल इंटिरियर ट्रेंड फोरकास्ट मध्ये रंगांच्या वापराला अतिशय महत्व दिले होते. उठावदार रंगसंगती ही तुमच्या घराच्या सजावटीचा एक मुख्य भाग बनु शकतो हे माहित आहे का तुम्हाला ?
तुमच्या घराच्या सजावटीमध्ये उठावदार रंगसंगती वापरण्याच्या विविध खुबी आहेत. एकच उठावदार रंग वापरावयाचा असल्यास पूर्ण फर्निचर शक्यतोवर फिकट रंगाचे ठेऊन आवडत्या उठावदार रंगाच्या विविध छटा तुम्हाला कर्टनस्, शिअर कर्टनस्, विविध आकारांच्या उषा, शोभेच्या वस्तु, भिंतीवरील चित्रांमध्ये वापरतां येतात. एखादा गडद रंगाचा सोफा तुमच्या लिविंगरुमला वेगळाच लूक देऊन जातो.
हल्ली गडद रंगाचे किचन कॅबिनेट व सफेद रंगाचा टाॅप असा ट्रेंड किचनसाठी आहे. अशा किचन मधे उठावदार रंगाचे हाऊसहोल्ड अप्लायन्सेस खुपच छान दिसतात. कलरफुल मग्ज, मोठे चमचे, भांडी तुमच्या किचनची शान वाढवतात.
 
बेडरुमसाठी देखील एखाद्या उठावदार रंगाचा वापर तुम्ही कर्टनस्, शिअर कर्टनस्, बेडकव्हर, बेडरनर्स, हेडबोर्ड, पिलो कव्हरस्, कुशन कव्हरस् इत्यादी मधे करु शकता. एखाद्या भिंतीला उठावदार रंगाचा वाॅलपेपर लावून देखील तुम्ही तुमच्या बेडरुममधे एक प्रकारचा तजेलदारपणा निर्माण करु शकता.
लहान मुलांच्या बेडरूममध्ये रंगाचा वापर करण्यासाठी सर्वात जास्त वाव मिळतो. बेडरुमच्या थिमनुसार कलरस्कीम नक्की झाल्यावर वाॅर्डरोब, बेड, बेड कव्हरस्, कुशन्स, स्टडी टेबलच्या वरील साॅफ्ट बोर्ड यांत एक किंवा दोन गडद रंगांचा वापर करून मुलांची रूम शोभिवंत करता येते. मुलांच्या वयोमानानुसार रंगाची निवड केल्यास मुलांची एनर्जी लेव्हल कायम राखण्यात या रंगांचा उपयोग नक्कीच होतो.
आपल्या विचारांचे व आवडीचे प्रतिक म्हणजे रंग. पूर्ण घरात फिकट रंगछटा वापरुन त्यात उठावदार किंवा गडद रंगांचा कौशल्याने वापर केल्यास तुमच्या घराची अंतर्गत सजावट सुरेख दिसेल यांत शंकाच नाही.
घरात वापरले जाणारे उठावदार रंग जसे घराला शोभा आणतात त्याचबरोबर मनात देखील प्रसन्नता निर्माण करतात. प्रसन्न मनामुळे घरात आनंदी वातावरण निर्माण होते. अशा ह्या आनंदी घरात राहायला सर्वांना नक्कीच आवडते.
 
तनुजा योगेश राणे
इंटिरियर डिझाइनर