Tanuja and associates
A 703 Divya Smit, Next to Blue Empire Complex,
Bandar Pakhadi Road, Kandivli (W), Mumbai, Maharashtra 400 067
India
Elegant Living Room | Tanuja And Associates Blogs

Blogs

Elegant Living Room

दिमाखदार लिव्हींग रूम

In Interior / by Tanuja Rane

दिमाखदार लिव्हींग रूम


आपल्या घरातील सर्वात वापरली जाणारी जागा म्हणजे लिव्हींग रूम, म्हणुनच ती सुखावह, आरामदायी त्याचबराेबर आजच्या काळाच्या मागणीनुसार स्टायलीश असणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे.त्यामुळेच लिव्हींग रूम आपल्या घराचेच नव्हे तर घरातील व्यक्तींच्या पर्सनॅलीटेचे प्रतीक ठरते.
लिव्हींग रूमचे डिझाईन करताना आपल्याला कुठल्या स्टाईलमध्ये डिझाईन करायचे आहे ते ठरवणे आवश्यक आहे. माॅडर्न , ट्रेडीशनल, कन्टेपररी, रेट्रो अशा विविध पर्यायांमधुन तुमच्या आवडीनुसार स्टाईल ठरवली असता त्याप्रमाणे रंग, टेक्क्षर, पॅटर्न कुठले वापरायचे ते ठरवणे सोपे ठरते.

लिव्हींग रूमचे प्लानींग करताना फर्निचरची साईझ लक्षात घेणे महत्त्वाचे असते. लिव्हींग रूमच्या आकारमानानुसार सोफा किंवा डायनींगची साईझ निवडणे योग्य ठरते अन्यथा हे फर्निचर तुमच्या घरात बोजड दिसु शकते. फर्निचरची आखणी करताना जास्तीत जास्त जणांना सहजपणे एकत्र बसता येईल अशा पद्धतीनें तीन सीटर सोफा, दोन सीटर सोफा, एल शेपचा सोफा, लाउंजर असे विविध सोफ्यांचे पर्याय उपलब्ध आहेत. लिव्हींगरूम लहान असल्यास फक्त फाॅर्मल सोफा सिटिंग राहू शकते, जर लिव्हींगरूम मोठी असेल तर फाॅर्मल सोफा सिटींग व इनफाॅर्मल सिटींग अशा दोन प्रकारच्या सिटींगची व्यवस्था आपण करू शकतो.
फ्लोअरींग लिव्हींगरूमच्या इंटिरियर मध्ये महत्त्वाची भूमिका बजावते कारण घरातील इतर कुठल्याही रूमपेक्षा लिव्हींगरुम मध्ये फर्निचर कमी असल्यामुळे फ्लोअरींग जास्तीत जास्त प्रमाणात दिसून येते. फ्लोअरींग मधे ईटालियन मार्बल, मोठ्या आकाराच्या विट्रीफाईड टाईल्स, वुडन फ्लोअरींग असे भरपूर व विविध पर्याय आज उपलब्ध आहेत.
लिव्हींगरुमची कलरस्कीम ठरवून त्याप्रमाणे एखाद्या उठावदार रंगाचा वापर सोफा, त्यावरील कुशन्स, वाॅलपेपर, कर्टन्स यामधे करुन योग्य तो परिणाम साधतां येतो. एखादा आर्ट पीस किंवा पेन्टींग तुमच्या घराचा फोकल पाॅईंट ठरु शकतो. डायरेक्ट व ईनडायरेक्ट लाईटस् चा योग्य तो वापर करुन घरात हायलाईट करणाऱ्या गोष्टींना योग्य तो न्याय देता येतो. योग्य प्रकाशयोजना तुमच्या लिव्हींगरुमचे सौंदर्य अधिकच खुलवते.
अशा सुंदर व स्टाईलिश लिव्हींगरुम मधे पाहुण्यांचे स्वागत करायला व तुमचा जास्तीत जास्त वेळ घालवायला तुम्हाला नक्कीच आवडेल.

 तनुजा योगेश राणे
इंटिरियर डिझायनर