Tanuja and associates
A 703 Divya Smit, Next to Blue Empire Complex,
Bandar Pakhadi Road, Kandivli (W), Mumbai, Maharashtra 400 067
India
Daughters Bedroom | Tanuja And Associates Blogs

Blogs

Daughters Bedroom

डाॅटर्स बेडरुम

In Interior / by Tanuja Rane

डाॅटर्स बेडरुम
प्रत्येक आई वडीलांचे स्वप्न असते की आपल्या मुलांना जगातील सर्व सुखसोयी द्याव्या. घराचे इंटिरियर करताना आपल्या लाडक्या मुलीसाठी बेडरुम डिझाईन करायची असल्यास हा उत्साह अधिकच द्विगुणीत होतो.
मुलीसाठी बेडरूम डिझाईन करायची असल्यास वयोगटाचा विचार अत्यंत महत्वाचा अाहे. १० वर्षाखालील मुलींसाठी चिल्ड्रेन्स बेडरूम प्रमाणे डिझाईन करायला लागेल.
हल्ली टिनेज किंवा तरुणाईतील मुलामुलींच्या स्वत:च्या आवडी निवडी अगदी पक्क्या झालेल्या असतात. त्यामुळे आपण कसे दिसावे, कपडे कुठले घालावेत याचबरोबर आपल्या रूमचे डेकोर कसे असावे याबद्दलच्या त्यांच्या संकल्पना स्पष्ट असतात. त्यामुळे या वयाच्या मुलांच्या बेडरूम डिझाईन करताना त्यांच्याकडून त्यांच्या अशा खुप इनपुटस् मिळतात त्यामुळे डिझाईन करायला पण बरेच सोपे होते.
तरुण मुलीची बेडरुम असल्यास तिचे थोड्या वर्षांनी लग्न होणार हे गृहीत धरून इंटिरीयर करावे लागते. त्यामुळे शक्यतोवर डबल बेडचा पर्याय स्वीकारला जातो. मुलींच्या बेडरूम मधे स्टोरेजला खुप महत्व आहे. कपड्यांमधे कॅज्युअल, फाॅर्मल, ट्रेडिशनल, पार्टी वेअर असे बरेच प्रकार असतात.आॅफीस बॅग, लॅपटॉप बॅग बर्ऱ्याच प्रकारच्या पर्सेस, ज्वेलरी, विविध प्रकारचे शुज, स्कार्फस्, मेकअप बाॅक्स अशा विविध प्रकारच्या गोष्टींसाठी भरपुर स्टोरेजची गरज असते. त्यासाठी वाॅर्डरोब व अॅक्सेसरीज स्टोरेज वेगळे केल्यास उत्तम. अभ्यास संपलेला असो किंवा नसो एक छोटे स्टडी टेबल असणे सुद्धा गरजेचे असते. त्याचबरोबर खिडकीजवळ एखादे सिटींग दिल्यास तिथे बसुन मैत्रीणींबरोबर गप्पा मारावयास त्यांना नक्कीच आवडेल. एक ड्रेसिंग टेबल व त्यासोबत आवश्यक लायटींग असणे अत्यंत गरजेचे आहे. बेडरुममधे विट्रीफाआईड टाईल्स असल्यास त्यावर वुडन फ्लोअरींग लावून बेडरूम ट्रेंडी बनु शकते. डायरेक्ट तथा ईनडायरेक्ट लाईट्स चा वापर करून उत्कृष्ट प्रकाश योजना असावी व त्यात माॅडर्न लाईट फीटिंगचा वापर असावा.
मुलींना लाईट पेस्टल शेड्स आवडतात. पेस्टल शेडसचा जास्तीत जास्त वापर करून उठावदार रंग अॅक्सेसरीज मधे वापरतां येईल. कलरफुल व पॅटर्न असलेले हेडबोर्ड, कलरफुल सिक्वेन्सच्या कुशन्स,
शिअर कर्टनस्, ट्विक्लींग स्ट्रिंग लाईटस, आवडत्या सुपरस्टारचे पोस्टर या सर्व गोष्टी वापरुन बेडरुम डिझाईन केल्यावर तरूणाईचा उत्साह इंटिरियर मधे उतरलेला नक्कीच दिसेल.

तनुजा योगेश राणे
इंटिरियर डिझायनर