Tanuja and associates
A 703 Divya Smit, Next to Blue Empire Complex,
Bandar Pakhadi Road, Kandivli (W), Mumbai, Maharashtra 400 067
India
Childrens Bedroom | Tanuja And Associates Blogs

Blogs

Childrens Bedroom

मुलांना मस्त वाटणारी बेडरुम

In Interior / by Tanuja Yogesh Rane

मुलांना मस्त वाटणारी बेडरुम
लहान मुले म्हणजे चैतन्य व उत्साहाचा खळखळता झरा. त्यांच्या घरातल्या वावरण्याने देखील घर आनंदाने न्हाऊन निघते. लहान मुलांच्या गरजा, आवडी-निवडी, छंद लक्षात घेऊनच त्यांच्या बेडरुमची रचना करावी लागते. ज्या काळात मुलांच्या मनाची जडण घडण होत असते त्या काळात त्यांना त्यांच्या मनासारखी बेडरुम बनवुन मिळाली तर ?
शान व न्यासा साठी बेडरुम डिझाईन करायला घेतली तेव्हा दोन सिंगल बेड का एक डबल बेड का बंक बेड करायचा हे ठरवायलाच बरेच दिवस लागले, कारण ही तसेच होते की त्यांची चुलत भावंडे घरी राहायला आल्यावर त्यांनाही पुरेल इतकी जागा बेडवर झाली पाहीजे अशी त्यांची अट होती. त्यामुळे बंक बेड मधे वरच्या बाजुला सिंगल व खाली डबल बेडचा पर्याय आम्ही निवडला. बंक बेड, दोघांसाठी वेगवेगळा वाॅर्डरोब, वेगवेगळी पुस्तकांची कपाटे, दोघांना मिळुन एक मोठे स्टडी टेबल आणि हे सर्व सामावून देखील मधे मुलांना खेळण्यासाठी प्रशस्त जागा असे प्लॅनिंग मस्त बसले.
दोघांच्या आवडत्या गडद रंगांबरोबर दोन रंग अजुन मिसळून एक छानशी कलरस्किम तयार केली. बेसीक फर्निचरचा रंग व्हाईट असल्यामुळे ह्या गडद रंगांचा वापर फक्त हॅण्डलस्, बंक बेडच्या स्टेप्स, वाॅर्डरोबची व कपाटाची बाजु अशा ठिकाणी केवळ हायलायटर म्हणुन केला त्यामुळे संपूर्ण खोलीला एक ताजेपणा आला. ह्या रंगांची अखंडता कायम ठेवण्यासाठी सिलिंग मधे देखील ह्या रंगांचा वापर केला. मुलांना साजेशी जाॅमेट्रिकल हॅण्डलस् खास साईटवर बनवुन घेतली. वाढते वय लक्षात घेउन न्यासा साठी ड्रेसिंग स्टोरेज ही बनवले. खास मुलांसाठी रिमोट वर उघड बंद होणाऱ्या पडद्यांची सोय केली. दोघांनाही रात्री झोपताना पुस्तके वाचण्याची आवड असल्याने खास भिंतीवरून बेडवर येणाऱ्या रीडिंग लाईटची व्यवस्था केली. दोन्ही मुलांचा वार्डरोब आतुन डिझाईन करताना देखील त्यांच्या वयानुसार त्यांचा हात सहज पोहोचेल अशा रितीने नेहमी वापरायचे कपडे ठेवण्यासाठी डिझाईन केल्याने शान तर भलताच खुश झाला. वाॅलपेपर व पडद्यासाठी लाईट ग्रीन कलर शेड वापरल्यामुळे एवढे फर्निचर असुनही रुमची भव्यता वाढवण्यास त्याचा नक्कीच उपयोग झाला.

तनुजा योगेश राणे
लक्झरी इंटिरियर डिझायनर